रावेर, प्रतिनिधी। अवैध वाळुने भरलेले टॅक्टर-ट्रॉली अजंदेकडून रावेरकडे येत असतांना तहसीलच्या पथकाने शासकीय विश्रामगृहाजवळ पकडल्याची घटना आज सकाळी घडली आहे. यामुळे चोरटी वाळुची वाहतूक करणा-यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत वृत्त असे की, अवैध वाळुने भरलेले टॅक्टर-ट्रॉली क्र एमपी १२ एम २४६८ अजंदेकडून रावेरच्या दिशेने येत असल्याची माहीती तहसील पथकाला मिळाली होती. हि माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करत तहसीलदार उषाराणी देवगुणे ह्या स्वतः आपले सहकारी संजय गांधी निराधारचे नायब तहसीलदार एम. जी. खारे, नायब तहसीलदार सी. जी. पवार, मंडळ अधिकारी प्रमोद ठोंबरे, तलाठी दादाराव कांबळे यांना घेऊन ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. संबधित टॅक्टर मालकाला दंडाची नोटीस बजावण्यात येणार आहे.