रावेर प्रतिनिधी । विनापरवाना गुरांची वाहतूक करणारे वाहन रावेर पोलीसांनी ताब्यात घेतले असून १९ गुरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई चोरवड नाका जवळ केली. वाहनचालकासह इतर दोघे फरार झालेत. याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील चोरवड नाकाजवळ बुऱ्हाणपुरकडून रावेरकडे येणारा ट्रकमध्ये पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास विनापरवाना गुरांची वाहतूक करणारा ट्रक येत असल्याची माहिती रावेर आरटीओ पोलीसांना मिळाली. त्यानुसार आरटीओ पोलीसांनी नाकाजवळ ट्रक येताच थांबवून तपासणी करत असतांना ट्रक चालकाने ट्रक न थांबविता बॅरिगेटिंगमधून भरधाव वेगाने पुढे निघाला. हे पाहून पोलीसांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान, ट्रक चालकाने ट्रक कच्च्या रस्त्याने ट्रक टाकला असता ट्रक फसला. हे पाहून ट्रक चालक आणि इतर दोघांनी घटनास्थळाहून पळ काढला. यावेळी पोलीसांनी ट्रकमध्ये कोंबून भरलेले १९ गुरे असल्याचे दिसून आले. सर्व गुरांची सुटका करण्यात आली असून त्यांना आरसी बाफना गौशाळेत रवाना करण्यात आले आहे. याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
यांनी केली कारवाई
आरटीओ विभागाचे वाहतूक निरीक्षक श्री. अहिरे, पीएसआय शेख, पो.ना. सुरवाडे, पो.कॉ. सुरेश मेढे, योगेश चौधरी, होमगार्ड यांनी ही कारवाई केली.