जळगाव बसस्थानकात पॅन्टच्या खिश्यातून २० हजारांची रोकड लंपास !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील नवीन बसस्थानकात बसमध्ये पत्नीला बसमध्ये चढवत असताना प्रौढ व्यक्तीच्या पॅन्टच्या खिशातून २० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवार २४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. या संदर्भात बुधवारी २५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे गोपाल किसन बारी (वय-५१, रा.यावल जि.जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून २४ जून रोजी ते आपल्या पत्नीसोबत जळगाव शहरात आलेले होते. दरम्यान सायंकाळी ५.३०वाजेच्या सुमारास ते बसमध्ये चढत असताना त्यांच्या पॅन्टच्या खिशातून २० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी बुधवारी २५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून या संदर्भात फिर्यादी दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता वाघमारे ह्या करीत आहे.