
जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बिलखेडा गावाजवळील स्वप्निल हॉटेल जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने रामदेववाडी येथील मुकेश आबेसिंग राठोड (वय २९) या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली होती. याबाबत गुरूवारी ३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी गावात मुकेश राठोड हा आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून तो उदरनिर्वाह करत होते. दरम्यान बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता मुकेश हा बिलखेडा गावाजवळील स्वप्निल हॉटेल समोरून पायी जात असतांना त्याला भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एमएच १९ बीपी ०१०१) ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मुकेशचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी आक्रोश केला होता. चौकशी अंती एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार वरील चालक अजय गोपीलाल साखला रा. जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ हे करीत आहे.



