पूर परिस्थितीत काळजी घ्यावी – जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना आवाहन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाची सुरूवात झाली आहे. त्यामुळे नदी नाले आणि तलाव पूर आल्याने जिल्हावासियांनी पूर परिस्थितीत घरीच बसून काळजी घ्यावी. असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मंगळवार, दि. १९ जुलै रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील तापी, गिरणा, पूर्णा यासह उपनद्यांना पूर आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतींच्या, घराच्या नुकसानीसह काही ठिकाणी जीवीत हानीदेखील झालेली आहे.

अजून काही दिवस मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांनी पूर परिस्थितीत घरीच किंवा संरक्षणस्थळी राहून काळजी घ्यावी. असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

 

Protected Content