बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील चिखली बुद्रुक येथे स्वस्त धान्य दुकानदाराकडून रेशनकार्ड धारकांची फसवणूक होत आहे. रेशन दुकानदाराची चौकशी करून त्यांचा परवाना रद्द करावा, अशा तक्रारीचे निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी यांना नुकतेच देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वस्त धान्य दुकानदार के.एस.पाटील हे रेशनकार्ड धारकाची फसवणूक करतांना ग्रा.पं. सदस्यंना आढळून आले आहे. पाटील धान्य देत असतांना कोणत्याही प्रकारीची पावती देत नाहीत. तसेच श्रीराम पाटील रेशनकार्ड नंबर 272019851204 यांना दर महिन्याला 12 किलो गहू आणि 8 किलो तांदूळ असे मिळायला पाहिजे, परंतू दुकानदार त्यांना महिन्याला 6 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ देतात. असे एकच व्यक्तीबाबत होत नसून गावातील बरेच गावक-यांना बाबत होत असल्याचे आढळून आले आहे. याचबरोबर अनेक प्रकार याठिकाणी होत असल्याचं येथील नागरिकांनाकडून बोलले जात आहे. या रेशन दुकानदाराची चौकशी करून त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव घेऊन करण्यात आली आहे. या निवेदनावर सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा संभाजी ब्रिगेड बोदवड तालुका उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी याबाबत तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे
. तक्रार अर्ज जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालयात प्राप्त झाला असून संबंधित रेशन दुकानदारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया तहसीलदार रवींद्र जोगी यांनी दिली आहे.