साताऱ्यात कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

accident5 201905244186

 

सातारा (वृत्तसंस्था) येथील बंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडलीय. दरम्यान, मृतांमध्ये 3 चिमुकले आणि 2 महिलांचा देखील समावेश आहे.

 

आज (बुधवार) भल्या पहाटे कर्नाटकच्या धारवाड येथील रहिवासी असलेले निझामुद्दीन सौदागर आपल्या 6 कुटुंबियांसह मुंबईला निघाले होते. याच दरम्यान, रात्री 1 वाजेच्या सुमारास बोरगाव परिसरात चालकाचे त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले. मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्यांमध्ये साडे तीन वर्षांचा मुलगा, 5 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांच्या दोन मुली होत्या. अपघात एवढा भीषण होता की, कारचा पूर्णपणे चुराडा झालेला होता.

Protected Content