अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

sunanda

\

जळगाव प्रतिनिधी । खासगी कामानिमित्त दुचाकीवरून शहरात जात असतांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने महिला जखमी झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली होती. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मिळालेली माहिती अशी की, सुनंदाबाई विजयसिंग पाटील (वय-61) रा. कल्याणहोळ ता. धरणगाव ह्या त्यांच्या नातेवाईकासोबत दुचाकीने जळगावात आल्या होत्या. शहरात दाखल झाल्यानंतर खोटे नगर रिक्षा स्टॉप जवळ भरधाव होन्डा सिटी कार क्रमांक (एमएच 02 एएल 0353) जोरदार धडक दिली. या अपघातात सुनंदाबाई या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारासाठी त्या प्रतिसाद देत नसल्याने जिल्हा सामान्य रूग्णालयात रवाना करण्यात आले. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी जमली होती. त्यांच्या मुळगावी कल्याणहोळ येथे पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना व नातवंडे असा परीवार आहे.

Add Comment

Protected Content