मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कालपर्यंत सोबत असलेले अशोक चव्हाण भाजपवासी झाले यावर विश्वास बसत नाही. आपल्या देशात काहीही घडू शकते असे ट्विट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिला आहे.
अशोक चव्हाण भाजपवासी झाले.विश्वास बसत नाही. काल पर्यंत ते सोबत होते.. चर्चा करीत होते..आज गेले.. एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.