दहिगाव येथे मराठा समाजाचा कॅन्डल मार्च

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता केलेल्या उपोषणास मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गावातील समाज बांधवांनी गुरूवारी सायंकाळी गावातुन काढला कॅन्डल मार्च यात मोठ्या संख्येत समाज बांधव सहभागी झाले होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करीता अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले होते त्यांना पाठिंबा देण्यासाठी च्या समर्थनार्थ दहिगाव तालुका यावल या गावात शेकडो समाज बांधव एकत्र आले व गुरूवारी सायंकाळी गावातील महादेव मंदिरापासुन कॅन्डल मार्च काढण्यात आले.

विठ्ठल मंदिर मार्गे माळी वाडा,श्रीराम मंदिर, कुंभार वाडा, पाटील वाडा, चौधरी वाडा, संभाजी नगर मार्गे हा मार्च मुख्य चौकात आला व मुख्य चौकात कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला, या प्रसंगी माजी सरपंच दिलीप बाबुराव चौधरी, मराठा सेवा संघ अध्यक्ष अजय पाटील प्रा.मुकेश येवले, महेश पांडुरंग पाटील ललित विठ्ठल पाटील, शैलेंद्र सुरेश पाटील, प्रमोद धनसिंग चौधरी, गुलाबराव चौधरी, दिनेश पाटील, किरण पाटील , डॉ.हेमंत येवले, पी.वी. पाटील, डी.बी. पाटील, समाधान पाटील , सागर भगवान पाटील, बाळकृष्ण लटकन पाटील,हिरामण पाटील, नानाजी पाटील, कोमल पाटील,मयूर पाटील, पुंडलिक पाटील, सुनील गावडे, अनिल बढे,नंदू पाटील, महेंद्र पाटील मोठ्यासंख्येने दहिगावसह परिसरातून मराठा समाज बांधवांसह इतर समाज बांधव या कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झाले होते.

Protected Content