Home Cities जामनेर पहूर येथे युवकांचा कँडल मार्च

पहूर येथे युवकांचा कँडल मार्च

0
39


पहूर ता जामनेर प्रतिनिधी । पुलवामा येथे जवानांवर झालेल्या भ्याड हल्लेच्या निषेधार्थ पेठ व कसबे गावातील युवकांनी कँडल मार्च काढून पहूर बस्थानकावर शोकसभा घेण्यात आली.

भारत माता की जय, वंदेमातरम या घोषणा देत सुमारे दोनशे युवकांनी कसबे व पेठ गावातून कँडल मार्च काढला. यादरम्यान पाकिस्तान मुर्दाबादच्याही घोषणा देऊन निषेध व्यक्त केला आहे. कोणतीही भाषणबाजी न करता कमी वेळात शोकसभेत शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समिती प्रमुख रामेश्‍वर पाटील, शैलेश पाटील,उपसरपंच रवींद्र मोरे, राजधर पांढरे, अँड एस आर पाटील, शंकर घोंगडे,लक्ष्मण गोरे ,ज्ञानेश्‍वर पवार, संदिप बेढे यांच्या सह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound