मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीराजें अपक्ष लढणार अशी माहिती होती, तसेच छत्रपती घराण्याचा मान राखूनच त्यांना उमेदवारीचा प्रस्ताव दिला होता, असे खा.संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजें यांनी अगोदरच राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असून महाविकास आघाडीने पाठींबा द्यावा असे आवाहन छत्रपती संभाजीराजें केले होते. परंतु अगोदर शिवबंधन बांधा, मग राज्यसभेसाठी उमेदवारी असा निरोप मुख्यमंत्र्यांकडून संभाजीराजेंना देण्यात येऊन दुपारपर्यंतची वेळ देण्यात आली होती.
परंतु छत्रपती संभाजीराजें यांनी सरळ कोल्हापूर गाठले होते. तर दुसरीकडे शिवसेना दुसरा उमेदवार देणार असून दोन्ही जागा जिंकून येणार असा विश्वास खा.संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. यानंतर मात्र मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली असून आम्ही छत्रपती घराण्याचा मान राखूनच संभाजीराजेंना उमेदवारीचा प्रस्ताव दिला आहे. आणि शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांची नावे मुख्यंत्री स्वतः जाहीर करतील असेही असल्याचे खा.संजय राऊत यांनी म्हटले आहे.