सिनेट सदस्य दिलीप पाटील यांची नियुक्ती रद्द करा ; राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची मागणी

bahinabai nmu

 

जळगाव प्रतिनिधी । कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे ABVP व RSS ची हिटलर शाही चालते. कुलगुरू ही त्यांच्या आदेशाने बसविलेले आहेत. तसेच विद्यापीठाच्या सर्व कमिटीवर ABVP चे कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. तसेच विद्यापीठात राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील हे रोज कुलगुरूंच्या कॅबिनमध्ये बसून हिटलरशाही करतात. तसेच विद्यापीठात कोणताही निर्णय त्यांच्याशिवाय घेतला जात नसून प्राध्यापक भटकर यांचे प्रेम प्रकरण देखील दाबले गेले. तसेच विद्यापीठात छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणार होते. ती फाईल देखील कुलगुरूंनी गुंडाळून लावली. तसेच माजी खासदार विजय पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने फेलोशिप चालू करावी, यासाठी निधी दिला होता. ते प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. तसेच विद्यापीठाच्या ठेवी या राष्ट्रीय बँकेत ठेवल्या होत्या. परंतु त्या जळगाव जनता बँकेत ठेवल्या गेल्या. याचे कारण असे की व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील व त्यांचे बंधू हे त्या बँकेशी संलग्न आहेत. म्हणून त्या ठेवी जनता बँकेत ठेवल्या आहेत.
विद्यापीठात राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून शिक्षण तज्ञ यांची निवड करतात. परंतु कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे ABVP प्रमुख दिलीप पाटील यांची नियुक्ती झाली. ते कुठलेही शिक्षण तज्ञ नाही, कोणत्याही विषयात त्यांना विशेष प्राविण्य नाही, तरीही त्यांची व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या सर्व प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, फार्मसी स्टूडेंट कौन्सिलचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष भूषण संजय भदाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रोहन सोनवणे यांनी केली आहे. सदर प्रकरण लवकरात लवकर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे जावून सदर प्रकरण निकली काढले जाईल, असे अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, अमळनेर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माजी शहरध्यक्ष उमेश सोनार, पारोळा तालुकाध्यक्ष अभिषेक पाटील, अमळनेर राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका अध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनील शिंपी, चाळीसगाव तालुकाध्यक्ष याग्नेश बाविस्कर, धरणगाव तालुका अध्यक्ष विजय पाटील, अभिषेक धमाल, अनिरुध्द सीसो दे, शुभम पाटील, गौरव पाटील आदींच्या सह्या होत्या.

 

Protected Content