तक्रारीसाठी कस्टमर केअरची कॉल केल्याने तरुणीला ४० हजारांचा गंडा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फ्लिपकार्डकार्ड कस्टमर केअरकडे आलेल्या पार्सलची तक्रार करण्यासाठी तरुणीने त्यांनी दिलेल्या क्रमांकावर तक्रार केली. दम्यान, तरुणीला विश्‍वासात घेवून तिच्याकडून बँकेचे डिटेल्स विचारुन तिला ४० हजारात गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला

आहे. शहरातील दंगलग्रस्त कॉलनीतील कौनिक शेख जाहिद (वय-१८) ही तरुणी शिक्षण घेत आहे. दि. २ जून रोजी त्या तरुणीने फ्लिपकार्डच्या पार्सलची कस्टमर केअरकडे तक्रार केली. यावेळी त्यांच्याकडून कौनिक यांना तक्रारीसाठी क्रमांक दिला. दरम्यान या क्रमांकावर त्यांनी तक्रार केली असता तक्रार घेणार्‍याने त्यांना विश्‍वासात घेवून त्यांच्याकडून बँक खात्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. आणि काही वेळातच त्यांच्याक बँक खात्यातून ३९ हजार ५०० रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कौनिक शेख जाहिद यांच्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content