शेतकरी संघटनेची दुष्काळी परिस्थितीत मदतीची हाक

WhatsApp Image 2019 05 21 at 8.42.30 PM

अमळनेर (प्रतिनिधी) खतांची भाववाढ कमी करावी, बँकाची सक्तीची वसूली थांबविण्यात यावी, पंतप्रधान पेन्शवन योजना राबवावी किंवा खात्यात पैसे मिळावे. जनावरांसाठी चारा छावण्या उपलब्ध करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

 

यावर्षी राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. दुष्काळात तेरावा महिना खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे. यात प्रती बॅग २०० ते २५० रु. वाढविण्यात आले आहेत. रासायनिक खतांच्या किंमती कमी करण्यात याव्या अशी शेतकरी संघटना अमळनेरकडून मागणी करण्यात आलेली आहे. तसेच बँकांची होणारी सक्तीची वसूली थांबविण्यात यावी व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात. पंतप्रधान पेन्शन योजनेचा लाभाथ्र्यांना लाभ मिळावा.पिक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावे.असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नरेश चौधरी, अभिमन हटकर, रामलाल कोळी, सुरेश पाटील, विनायक पाटील, समाधान पाटील, गणेश पाटील आदिंच्या स्वक्षरया आहेत.

Add Comment

Protected Content