राफेल डीलवरील कॅगचा अहवाल राष्ट्रपतींना सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. तशातच याबाबतचा अहवाल कॅगने राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या बुधवारी संपणार आहे. त्यामुळे उद्या किंवा परवा कॅगचा अहवाल लोकसभा आणि राज्यसभेत सादर केला जाऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा राफेल डीलवरील वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

कॅगने अहवालाची एक प्रत राष्ट्रपतींना आणि दुसरी प्रत अर्थ मंत्रालयाला पाठवली आहे. या अहवालात एकूण 12 प्रकरणं आहेत. काही आठवड्यांपूर्वीच संरक्षण मंत्रालयाने राफेलबद्दलचा सविस्तर उत्तर आणि संबंधित अहवाल कॅगला सोपवला होता. यामध्ये खरेदी प्रक्रियेबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती होती. याशिवाय 36 राफेल विमानांच्या किमतींचाही समावेश होता. कॅगचा अहवाल अतिशय मोठा असून तो प्रोटोकॉलप्रमाणे सर्वप्रथम राष्ट्रपतींना पाठवण्यात आला. यानंतर आता राष्ट्रपती भवनाकडून हा अहवाल लोकसभा आणि राज्यसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला पाठवला जाईल.

Add Comment

Protected Content