रावेर पीपल्स बँक तज्ञ संचालकपदी सीए. दीपिका अग्रवाल यांची निवड


रावेर : लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील प्रतिष्ठित रावेर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या तज्ञ संचालकपदी सीए. दीपिका रोहित अग्रवाल यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीचे शहरात तसेच जिल्ह्यात सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे. बँकेच्या संचालक मंडळाने सर्वानुमते हा निर्णय घेतला.

या निवडीसाठी झालेल्या बैठकीला बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी पॅनल प्रमुख प्रल्हाद महाजन, उपाध्यक्ष राजेश शिंदे, सोपान पाटील, संजय वाणी, मानस कुलकर्णी, पंकज पाटील, सोपान साहेबराव पाटील, राजेंद्र चौधरी, ऍड. प्रवीण पासपोहे, विनोद तायडे, पुष्पा महाजन, मिराबाई राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहित अग्रवाल, गोंडू महाजन व पिंटू महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

सीए. दीपिका अग्रवाल या बँकिंग, लेखा आणि वित्तीय व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व असून त्यांचा तज्ञतेचा लाभ रावेर पीपल्स बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होईल, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीने बँकेच्या महिला सक्षमीकरणाच्या दिशेनेही एक सकारात्मक पाऊल पडले आहे.

दीपिका अग्रवाल या माजी उपनगराध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या सुनबाई असून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहित अग्रवाल यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या कुटुंबाने रावेर शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि वित्तीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे या निवडीबद्दल रावेर शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.