Home क्राईम आदर्श नगरातून सायकल चोरीला

आदर्श नगरातून सायकल चोरीला

bycle robbary
bycle robbary

bycle robbary

जळगाव प्रतिनिधी । आदर्श नगरात असलेल्या सरस्वती अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली सायकल चोरीला गेल्याची घटना 5 मे रोजी घडली होती. याबाबत आज रामानंद पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, भावेश सुधीर मांडे (वय 34) रा. सरस्वती अपार्टमेंट, आदर्श नगर हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा जितेश यांची हिरो कंपनीची सायकल अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये 4 मे रोजी रात्री 9.30 वाजता लावली, दुसऱ्या दिवशी सकाळी 5 मे रोजी सकाळी 10 वाजता पार्किंग केलेल्या जागी सायकल मिळून आली नाही. तिचा शोध घेतल्यानंतरही मिळून आली नाही. दरम्यान जितेशने आदर्श नगर, स्टेट बँक कॉलनी, गणपती नगर या भागात जावून भंगार दुकानावर चौकशी केली तर मिळून आली नाही. भावेश मांडे यांच्या फिर्यादीवरून रामानंद पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound