भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील सोपान कॉलनी परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याचं बंद घरातून टीव्ही, साऊड सिस्टीम, फॅन आणि रोकड असा एकुण २८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता समोर आली. याप्रकरणी रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
परमजित सिंह दलविंदरसिंह बन्सल वय ४२ रा. श्रीगंगा नगर, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे सोपान कॉलनीतील घर हे २४ ते २५ मार्च दरम्यान बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरातून टीव्ही, साऊड सिस्टीम, फॅन आणि १५ हजारांची रोकड असा एकुण २८ हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आला. त्यानंतर परमजितसिंह बन्सल यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीखक इकबाल सैय्यद हे करीत आहे.