जळगाव जिल्ह्यात आधार संच वितरणाची संधी; अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील २५ महसूल मंडळे आणि ७ शहरी भागांमध्ये नवीन आधार केंद्र सुरू करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालयाने अर्ज मागवले आहेत. इच्छुक आपले सरकार केंद्र चालकांनी २ एप्रिल पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून आधार संच उपलब्ध झाले आहेत. सध्या ज्या महसूल मंडळांमध्ये आधार केंद्र नाहीत, अशा २५ महसूल मंडळे आणि ७ शहरी भागांमध्ये आधार केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक अर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.jalgaon.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रता निकष, रिक्त महसूल मंडळांची नावे आणि आवश्यक माहिती घ्यावी. त्यानंतर, अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे https://forms.gle/Bn1s4filH1SDDQB97 या गुगल लिंकवर २ एप्रिलपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवावीत. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आधार सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

Protected Content