Home Cities चोपडा शनिवारी चोपडा येथे राकेश जैन यांचे बिजनेस डेव्हलपमेंटविषयी मार्गदर्शन

शनिवारी चोपडा येथे राकेश जैन यांचे बिजनेस डेव्हलपमेंटविषयी मार्गदर्शन

0
28

WhatsApp Image 2019 04 11 at 3.08.02 PM

चोपडा (प्रतिनिधी )- येथील चोपडा पिपल्स को- ऑप बँक लि. सार्वजनिक सेवा ट्रस्ट आणि भारतीय जैन संघटना शाखा चोपडा यांच्या संयुक्त विद्यमानाने दि १३ एप्रिल रोजी बिजनेस डेव्हलपमेंट चोपडा पिपल्स बँक हॉल गुजराथी गल्ली येथे सकाळी ९ वाजता होणार आहे

 

याबिजनेस डेव्हलपमेंट कार्यक्रमाला  इंदोर येथील  मॅनेजमेंट गुरू राकेश जैन  हे येणार असून बदलत्या काळात व्यापारात काय बदल आवश्यक आहे , पारंपारिक व्यवसायाला उतरती कळा,  जुन्या व्यवसाय चालने का कठिण झाले , व्यवसाय संबधी नवीन पिढीला आकर्षित कसे करणार , स्पर्धेच्या युगात आपला व्यवसाय कसा टिकवून ठेवायचा , नवीन तंत्रज्ञान बरोबर आपला व्यवसायाला कसे बदलणार , आपल्या व्यवसायाचा मार्केटमध्ये कसे नावलौकिक करणार अश्या विविध विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.  यासाठी पूर्ण दोन तास मार्गदर्शन करणार आहेत. चोपडा पिपल्स बँकचे हरीश गुजराथी , किशोर  गुजराथी, भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष क्षितिज चोरडिया, सचिव दिनेश लोडाया,  उपाध्यक्ष विपुल छाजेड,  जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल जैन , विभागिय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन,  सल्लागार दीपक राखेचा,  जिल्हा प्रतिनिधी प्रवीण जैन,  सहसचिव चेतन टाटीया,  कोषाध्यक्ष निर्मल बोरा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्टचे चेरअमन चंद्रहासभाई गुजराथी यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound