अपघातात बसचालक जखमी; एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वडनगरी फाट्याजवळ दुचाकीने दिलेल्या धडकेत बस चालक जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. याबाबत मंगळवार १२ डिसेंबर रोजी अज्ञात दुचाकीधारकावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथे शिवमहापुरांच्या कथेच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता बस चालक पंडित सरदार जाधव (वय-४१) रा. वाघ नगर जळगाव हे ड्युटीवर होते. त्यावेळी ते लघुशंकेसाठी रोड ओलांडून जात असतांना त्यांना मागून अज्ञात दुचाकीधारकाने  जोरदार धडक दिली. या धडकेत एसटी चालक पंडित जाधव हे जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मंगळवारी १२ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव हे करीत आहे

Protected Content