चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी शिवारातील शेत गट नंबर २५८ येथे असलेल्या शेतात अचानक आग लागल्याने ठिबक नळ्या, पीव्हीसी पाईप आणि लिंबूचे झाडे जळून ५० हजार रुपये किमतीचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी २८ मे रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. ही आग कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, गुणवंतराव बारीकराव शिंदे वय-६६, रा. भऊर ता. चाळीसगाव हे आपले परिवारास वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी शिवारातील शेत गट नंबर २५८ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी लिंबूचे झाडे तसेच ठिबक नळ्या, पीव्हीसी पाईप ठेवण्यात आले होते. दरम्यान मंगळवारी २८ मे रोजी दुपारी २ वाजता अचानक या शेतात आग लागली. या आगीत ठिबक नळ्या, पीव्हीसी पाईप व लिंबूची झाडे जळाल्याने शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.ही आग कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी बुधवारी २९ मे रोजी सकाळी ११ वाजता मेहुणबारे पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अन्वर तडवी करीत आहे.