मुक्ताईनगर, पंकज कपले । जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वक्तव्य केल्यामुळे आज मुक्ताईनगर येथे शिवसैनिकांच्या वतीने शहरांमधील प्रवर्तन चौकात राणे यांचा पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
जन आशीर्वाद यात्रेमध्ये नारायणराव राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वक्तव्य केल्यामुळे आज मुक्ताईनगर येथे शिवसैनिकांच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. व नारायण राणे यांचे बॅनर बनवून निषेध मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देण्यात आले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/378004390619535