पुरोगामी नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनुस्मृतींचे दहन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनुस्मृतीच्या निषेधार्थ पुरोगामी विचार सरणीच्या नागरिकांतर्फे जोरदार घोषणाबाजी करत मनुस्मृतीचे प्रतिकात्मक पोस्टरचे दहन करण्यात आले. माजी नगरसेवक तथा समन्वयक विकास पाटील, खलिल देशमुख, अभय पाटील, पप्पू राजपूत, सुनिल शिंदे, डी. एम. मोतीराय, जय वाघ, संगिता साळुंखे, डी. एन. पाटील, प्रविण ब्राह्मणे, अँड अंकुश कटारे, कैलास सोनवणे, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, बाबाजी ठाकरे, जनार्दन पाटील, बंडू मोरे, जिभाऊ पाटील, गणेश पाटील, सुनिल पाटील, निलेश मराठे, आनंद नवगिरे, रोहीदास बागुल, संतोष मोरे, बबलू आदीवाल, खंडु सोनवणे, अशोक मोरे, देविदास सावळे,दीपक मुळे, अरविंद जगताप, सुधाकर मेढे, प्रकाश विसपुते,राजु पाटील, सुनिल महाजन, कन्हैया देवरे, धर्मसिंग पाटील, राहुल बोरसे,दीपक महाजन, रोहित ब्राह्मणे, लतिफ खाटीक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजक समन्वयक विकास पाटील, पप्पू राजपूत, खलिल देशमुख, डी. एन. पाटील, सुनिल शिंदे अँड.अंकुश कटारे यांनी केले. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहरातील पुरोगामी परिवर्तनवादी व प्रागतिक विचारांच्या नागरिकांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्य शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या व्दारा संशोधन व पाठ्यक्रमात अभ्यासक्रमात मूल्यशिक्षणांच्या नावाखाली असमानतेला प्रोत्साहन देणारी मानवात भेदाभेद करणारी स्त्रीयांना अपमानीत करणारी मनुस्मृती व मनाचे श्लोकांचे समावेश करण्यात येत असुन येऊ पाहणारा नवीन सांस्कृतिक दहशतवादा विरूद्ध प्रागतिक विचार ठेवणारे पुरोगामी नागरिकांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येऊन मनुस्मृती दहन करण्यात आले यावेळी शहरातील विविध पक्ष संघटना सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, ओबीसी सेवा संघ, सत्यशोधक समाज, समता परिषद, बौध्द महासभा, वंचित बहुजन आघाडी, क्षत्रिय ग्रुप, समता सैनिक दल, महापुरुष सन्मान समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Protected Content