जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या निमखेडी शिवारातील साई पॅलेस येथील बंद घर फोडून सोन्याचे दागीने चांदीच्या मुर्त्या आणि रोकड असा एकुण १ लाख ५४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजया चंद्रप्रकाश पद्मावत (वय-४५) रा. साई पॅलेस, निमखेडी शिवार, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता विजया पद्मावत हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ५४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता विजया पद्मावत या घरी आल्या तेव्हा लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.