अमळनेरात दोन ठिकाणी घरफोडी; २ लाख २४ हजार २०० रूपयांचा ऐवज लांबविला

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील दोन ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. यात मुंदडा नगर, संत सखाराम नगर येथील दोन बंद घर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि दुचाकी असा एकुण २ लाख २४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी १२ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

यातील पहिल्या घटनेत मुंदडा नगरात राहणारे नरेंद्र प्रकाश सुर्यवंशी वय-३९ हे शेतकरी असून शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ११ जून रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे पुढील दरवाजा तोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने व रोकड असा एकुण ६९ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार बुधवारी १२ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. तर दुसऱ्या घटनेत शहरातील संत सखाराम नगरात राहणारे हुकुमचंद शांताराम पाटील यांच्या घरातून देखील‍ रोकड, सोन्याचे व चांदीचे दागिने आणि दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएन ८२) असा १ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला. या दोन्ही घटनेत एकुण एकुण २ लाख २४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे १२ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी दोन्ही घर मालकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात सायंकाळी ६ वाजता वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे व पोहेकॉ संताष पवार हे करीत आहे.

Protected Content