घरगुती गॅस खासगी वाहनात भरणाऱ्यावर धडक कारवाई; २० हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शेरा चौकात एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करून खाजगी वाहनात भरणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता कारवाई केली आहे. त्याच्याकडून घरगुती गॅससाठी लागणारे ६ सिलेंडर आणि गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गेल्या आठवड्यात ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता इच्छादेवी चौकात अवैधपणे घरगुती गॅस वाहनांमध्ये भरत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठा अपघात झाला होता. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. या अनुषंगाने एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता जळगाव शहरातील शेरा चौकात एका पत्राच्या शेडमध्ये घरगुती गॅसचा वापर करून खाजगी वाहनात भरणाऱ्या सलीम खान अफसर खान (वय-२०, रा. रजा कॉलनी जळगाव) याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून घरगुती गॅसचे ६ सिलेंडर जप्त केले. तर गॅस भरण्याची इतर साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सलीम खान अफसार खान याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहे.

Protected Content