यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव आणि साकळी या दोन गावांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे दिड लाख रुपये किमतीची दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना घडली असून याबाबत पोलीस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की किनगाव येथील आत्माराम नगर मध्ये राहणारे रफीक वजीर तडवी यांच्या घरातुन दिनांक २९ मे रोजी रात्रीच्या सुमारास रफीक तडवी यांच्या घरातील मंडळीवर घराच्या छतावर झोपलेली असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत घरातील फर्नीचर ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे सुमारे १लाख दहा हजार रूपये किमतीचे दागीने व२ हजार रूपये रोख असा१ लाख२० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
दुसर्या ठिकाणी दिनांक ३० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोळीळाबाई काशिनाथ पाटील राहणार लोधीवाडा साकळी येथे यांच्या घरातील मंडळी ही छतावर झोपलेली असतांना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरड्यांनी घराच्या प्रवेशव्दारे चे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटा मध्ये ठेवलेले २० हजार रूपये किमतीचे दागीने व१७ हजार रूपये रोख चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत कोकिळाबाई काशिनाथ पाटील ( राहणार साकळी ) व रफीक वजीर तडवी ( राहणार किनगाव बु॥ ) यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन ,पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे व सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी हे करीत आहेत.