जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जवळील पत्र्याच्या खोलीत मध्यरात्री अज्ञात चोरटे शिरून मोबाईल, टिव्हीसह ९ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छाया सुरेश राठोड (वय-३०) रा. म्हसावद खडका भुसावळ ह.मु. कालिंका माता मंदीर जवळील सहारा हॉटेलच्या बाजूला. जळगाव. हे आपल्या कुटुंबियासह मजूरी करून उदरनिर्वाह करतात. १७ मार्च रोजी रात्री सर्वजण जेवण करून झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घरात शिरून घरातील ८ हजार ५०० रूपये किंमतीचे तीन मोबाईल आणि मिक्सर असा एकुण ९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार १८ मार्च रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी छाया राठोड यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहे.