बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील महावितरणच्या कार्यालयात लाईनमन दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
केंद्रीय विद्युत मंत्रालयाच्या अधीसुचनेनुसार ४ मार्च हा लाईनमन दिवस साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने शनिवारी बुलढाना महावितरण कार्यालय विद्युत भावन येथे लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री जायभाये तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापक मानव संसाधन विभाग मनीष कदम, उपकार्यकारी अभियंता बुलढाणा उपविभाग लाहोडे, सहायक अभियंता दुरुस्ती विभाग श्री बंगाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थित सर्व लाईनमन जन्मित्रांचे स्वागत पुष्पगुछ देऊन मंचकावरील उपस्थितांनी केले त्यानंतर श्री बंगाळे ह्यांनी लाईनमन विषयी कृतज्ञता व्यक्त करत विचार मांडले. श्री लाहोडे यांनी आजची आव्हाने असलेली विपरीत परिस्थिती व त्याला संयमाने तोंड देणारे लाईनमन याबाबत सविस्तर सांगत शुभेच्छा दिल्यात. तर अध्यक्षिय भाषणात श्री जायभाये यांनी लाईनमन हा कसा महावितरणचा कणा आहे, आणि तो शाबूत असेल, ताठ असेल तर आणी तरच महावितरण आजच्या या स्पर्धेच्या युगात तग धरू शकते यावर भाष्य केले.
तसेच याप्रसंगी महावितरण नाट्य संघाने जे राज्यपातळीवर यश मिळवले त्याबद्दल त्या संपूर्ण संघाचे सुद्धा अभिनंदन केले पुष्पगुछ देऊन सत्कार केला. सदर नाट्य चमू मध्ये सुद्धा बरेच लाईनमन व तांत्रिक कर्मचारी असल्याने आजच्या दिवसाचे औचित्या साधात हा सत्कार घेण्यात आला. ह्या प्रसंगी अनेक लाईनमन बंधू महिला भगिनींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देशमाने यांनी तर प्रास्ताविक अमित इंगळे यांनी केले आभार प्रदर्शन संतोष पाटील यांनी केले. या प्रसंगी सर्वांना सुरक्षिततेची व ग्राहकभावना जोपासून काम करण्याची शपथ सुद्धा देण्यात आली.
लाईनमन दिनी सर्व कर्मचारी व त्याचे कुटुंबीय ह्यांच्या साठी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले ह्यासाठी बुलढाण्यातील सुप्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉ. पाटील मॅडम ह्यांनी आपली सेवा दिली. कार्यक्रमाच्या शेवटी कार्याल्यातर्फे चहापान व अल्पोपहार ठेवण्यात आला. अशा प्रकारे अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पडला ह्या कार्यक्रमाला सर्व लाईनमन ऑफिस मधील कर्मचारी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.