बीएसएनएलचा “हाय स्पीड डेटा” प्लॅन; मिळणार इतका जीबी डेटा !

नवी दिल्ली लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल सध्या अधिकाधिक ग्राहक जोडण्यासाठी विविध प्रकारचे योजना आणली आहे. अधिकाधिका ग्राहकांना बीएसएनएलकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन देण्याचा प्रयत्न करत आहे. आता नव्यानं बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी विंटर बोनांझा ऑफर आणली आहे.

कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे यासंदर्भातील माहिती दिलीये. विंटर बोनांझा ऑफरमध्ये बीएसएनएल आपल्या युजर्सना केवळ १ हजार ९९९ रुपयांमध्ये ६ महिन्यांसाठी भारत फायबर ब्रॉडबँड सेवा देत आहे.

बीएसएनएलच्या विंटर बोनांझा ऑफरअंतर्गत बीएसएनएल युजर्संना केवळ १ हजार ९९९ रुपयांत ६ महिन्यांपर्यंत हायस्पीड डेटाचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये युजर्सला २५ एमबीपीएसच्या स्पीडनं दरमहा १३०० जीबी डेटा दिला जात आहे. एवढेच नाही तर लिमीट संपल्यानंतर युजर्स ४ एमबीपीएसच्या स्पीडनं अनलिमिटेड इंटरनेटचाही फायदा घेऊ शकतात. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये युजर्स लँडलाइनच्या माध्यमातून अनलिमिटेड कॉलिंगचा ही फायदा घेऊ शकतात. बीएसएनएलचा हा ब्रॉडबँड प्लॅन देशातील सर्व टेलिकॉम सर्कलसाठी आहे. यात दिल्ली आणि मुंबईतील युजर्सचा समावेश नाही.

बीएसएनएलचा ५९९ रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलनं आपल्या युजर्ससाठी ५९९ रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लानमध्ये युजर्संना ८४ दिवसांची वैधता मिळेल, ज्यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, दररोज ३ जीबी डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतील. दरम्यान, बीएसएनएल सध्या ४जी नेटवर्कवरही काम करत आहे. लवकरच देशभरात बीएसएनएलचे ५-G नेटवर्क सुरू होणार आहे.

Protected Content