भुसावळ येथे शिवसेना–भाजप समन्व्यकांची बैठक…

download 4

जळगाव (प्रतिनधी ) गुरुवार ११  एप्रिल रोजी शिवसेना व भाजप युतीतील समनव्यक ना. गिरीष महाजन व ना. दादा भुसे,  ना. गुलाबराव पाटील यांच्या  प्रमुख उपस्थितीत रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व प्रमुख लोकप्रतिनिधीची बैठक भुसावळ येथिल होटेल तनारीका येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

 

या बैठकीस सर्व उपजिल्हाप्रमुख,  तालुकाप्रमुख ,  शहरप्रमुख,  उपजिल्हा संघटक,  तालुका संघटक , शहर संघटक, महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,  गटप्रमुख,  गणप्रमुख ,  विभागप्रमुख , युवासेना प्रमुख पदाधिकारी सर्व शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी ठीक संध्या. 6:00 वा. भुसावळ येथिल होटेल तनारीका येथे उपस्थित उपस्थिती रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख  चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content