पिंप्राळा उड्डाणपुलाखाली तुटलेला मेनहोल; अपघाताचा धोका !

जळगाव-फरजाज सय्यद | जळगाव शहरातील पिंप्राळा उड्डाणपुलाखालील गटारीच्या मेनहोलचे झाकण तुटले असून, यामुळे वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा तुटलेला मेनहोल न दिसल्यास मोठा अपघात घडू शकतो.

पिंप्राळा उड्डाणपुलाच्या दूध फेडरेशनकडून कानळदा रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर, ब्रह्मकुमारी विद्यालयासमोर हा मेनहोल उघडा पडला आहे. यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला आहे. दुचाकीस्वार अथवा अन्य छोटे वाहन या खड्ड्यात अडकल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. या धोकादायक परिस्थितीला त्वरित आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मेनहोल दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

देशात यापूर्वीही मेनहोलमध्ये लहान मुले पडून मृत्यमूखी पडल्याच्या घटना घडलेल्या आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने यांची तातडीने दखल घ्यावी, याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने वेळीच योग्य ती उपाययोजना न केल्यास संभाव्य दुर्घटनेसाठी जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Protected Content