जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील एका कंपनीच्या ऑफीसची खिडकीतून अज्ञात चोरट्यांनी कॉम्प्यूटर, डीव्हीआरसह इतर इलेक्ट्रॉनीक वस्तूंची चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, एमआयडीसीतील एम सेक्टरमध्ये ओम पॉलीमर्स नावाची कंपनी आहे. २४ एप्रिल रोजी सकाळी १० ते ५ मे २०२१ दरम्यान कंपनी बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या ऑफीसची खिडकीची जाळी तोडून आत मधील कॉम्प्यूटर, सीसीटीव्ही डीव्हीआर, मॉनीटर, किबोर्ड, माऊस असा एकुण ६३ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी कंपनीचे लोकेश आनंदराव मराठे (वय-२२) रा. मेहरूण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.