चौबारी येथे किराणा दुकान फोडले; मारवड पोलीसात गुन्हा दाखल

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील चौबारी येथे किराणा दुकान फोडून दुकानातील रोकडसह किराणा सामान असा एकुण ६० हजार रुपये किमतीचे रोकड आणि किराणा माल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, संजय भागचंद जैन (वय-४०) रा. चौबारी ता. अमळनेर यांचे संजय प्रोव्हीजन नावाचे किराणा दुकान आहे. १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता जैन यांनी किराणा दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडून दुकानातील ३५ हजार रुपयांची रोकड आणि किराणा सामान असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे १६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याप्रकरणी संजय जैन यांनी मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक भास्कर चव्हाण करीत आहे.

 

Protected Content