जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुण्यातील राज्यस्तर २१ व्या एलएक्सटी युनिटेड रेस रोलर स्केटिंग स्पर्धेत एकलव्य स्केटिंग अकॅडमीच्या १० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात त्यांनी चमकदार कामगिरी केली.
या स्पर्धेतील खेळाडूंमध्ये जियांश जितेंद्र चौधरी, जान्हवी मिलिंद चिंचोलकर, तेजस्विनी विनोद सोनवणे, पूर्व विवेक टोके, केदार ज्ञानेश्वर चव्हाण, सान्वी सुनील रेवतकर, मनस्वी हेमंत काळे, ओजल तुषार तळेले, रोहित गेंदालाल पाटील व अथर्व राजू चोपडे यांचा समावेश होता. या स्पर्धेत उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करीत जियांश जितेंद्र चौधरी याने ०५ वर्षे वयोगटात रजत पदक, मनस्वी हेमंत काळे हिने ०९ वर्षे वयोगटात रजत पदक, ओजल तुषार तळेले याने ११ वर्षे वयोगटात कांस्यपदक व जान्हवी मिलिंद चिंचोलकर हिने १४ वर्षे वयोगटात कांस्यपदक मिळवत विजय संपादन केला. या खेळाडूंना एकलव्य स्केटिंग अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक डॉ. रणजित शामराव पाटील व सहायक प्रशिक्षक रिना हिंमत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष डी.टी. पाटील, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.