चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्यासाठी ३ हजारांची लाच स्वीकारणार्या चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील दीपक देविदास ठाकूर या कर्मचारी धुळे एसीबीच्या पथकाने पोलिस ठाण्यातच अटक केली आहे. याकारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विवाहितेच्या छळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्यासाठी तीन हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातील दीपक देविदास ठाकूर या कर्मचारी धुळे एसीबीच्या पथकाने पोलिस ठाण्यातच अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी देखील अशाच पद्धतीने पोलीस ठाण्यात 5 हजारची लाच घेणाऱ्या दोन पोलिसांना अटक केली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.