जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आठ हजाराची लाच घेताना बोदवड तहसीलदारांसह चौघे जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे वाळू वाहतूकीचा व्यवसाय आहे. अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त पैश्यांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे. वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आठ हजाराची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणीसाठी जळगावच्या लाचलुचपत विभागाने आज सापळा रचला होता. यावेळी बोदवडचे तहसीलदार योगेश टोणपे यांच्यासह तलाठी, त्यांचा वाहन चालक आणि एका खासगी पंटरला जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने आठ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.