ब्रह्माकुमारीज् चोपडा सेवा केंद्रास मान्यता

 

WhatsApp Image 2019 07 06 at 13.45.27

चोपडा प्रतिनिधी । प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिक्षण प्रभागातर्फे नुकतेच मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षणाचे विविध अभ्यासक्रम चालविले जात आहेत. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संवर्धनाच्या या प्रयत्नांची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मूल्यशिक्षणात बी.ए., डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा अभ्यासक्रम सुस्र् केले असून याचे मान्यताप्राप्त अभ्यासकेंद्र म्हणून ब्रह्माकुमारीज् चोपडा सेवाकेंद्रास मान्यता मिळालेली असुन, या अभ्यासकेंद्राचा उद्घाटन कार्यक्रम रविवार (दि. 07 जुलै) रोजी सकाळी 9 वाजता ब्रह्माकुमारीज् यावल रोड नगरस्थित सेवाकेंद्रात आयोजित करण्यात आलेला आहे.

समाजात नैतिक, चारित्रीक व इतर मूल्यांचा होणारा सतत ­-हास, लोप चाललेली आध्यात्मिकता आणि पर्यायाने कमजोर होत चाललेल्या कुटुंब व्यवस्था आदि समस्यां सोडविण्यासाठी अनेक सामाजिक, आध्यात्मिक पुढे सरसावल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय या आध्यात्मिक शिक्षण संस्थेचे शिक्षण प्रभाग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या मूल्य शिक्षण आणि आध्यात्मिकता या विषयावर पदव्यूत्तर पदवीका आणि पदवी अभ्यासक्रम डिग्री करण्यात आलेला आहे. प्रवेश प्रक्रिया ब्रह्माकुमारीज् तर्फे राबविण्यात येईल व परीक्षा, निकाल, पदवी प्रदान समारंभ आदि सर्व प्रक्रिया विद्यापीठातर्फे होणार आहेत. ब्रह्माकुमारीज् या विश्वव्यापी आध्यात्मिक शिक्षण संस्थेद्वारे सातत्याने मूल्यनिष्ठ सदर अभ्यासक्रमाचा लाभ वैयक्तिक मूल्यसंवर्धनासाठी तर होईलच परंतु विविध सरकारी नोक-यामध्ये, शिक्षकांना, एम.एस.डब्लू, मास कम्युनिकेशन, अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक यांना नोकरी बढतीसाठी करीयर डिग्री इच्छिणारे यांना होणार आहे. बारावी उत्तीर्ण ही अट बी.ए.साठी असून, 12 वी पेक्षा कमी शिक्षण झालेल्यांसाठी पूर्वतयारी परीक्षा देऊन प्रवेश घेता येईल. अभ्यासक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात संपर्क साधता येईल.
तरी सर्व नागरिकांना उपस्थिती द्यावी असे आवाहन ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, मंगलादीदी, प्रा. विकास साळुंखे अभ्यासक्रम समनव्यक आणि डॉ सोमनाथ वडनेरे, माध्यम समनव्यक यांनी केले आहे.

Protected Content