Breaking : आमदार निवासात शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

 

मुंबई प्रतिनिधी । आमदार निवासातील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एक शिक्षक करत असल्याने खळबळ उडाली असून त्यांची समजूत काढण्यासाठी विधानसभाध्यक्ष व उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण मंत्री पोहचले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आमदार भवनातील इमारतीवर चढून एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न  केला आहे. आपल्याला वेतन मिळावे अशी मागणी या शिक्षकाने केली आहे. दरम्यान, विधानसभाध्यक्ष नाना पटोले व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी पोहचून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, संबंधीत शिक्षकाचे नाव गजानन खैरे असल्याचे माहिती समोर आली आहे.

Protected Content