मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 17 उमेदवारांची यादी आज जाहीर केली असून यात जळगावच्या उमेदवाराचे नाव नसल्याने याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
भारतीय जनता पक्षाने आधीच आपली 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यानंतर कॉंग्रेसनेही पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यानंतर आज शिवसेना-उबाठा पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. यात बुलढाण्यातून प्रा. नरेंद्र खेडेकर; छत्रपती संभाजी महाराज नगरातून चंद्रकांत खैरे; यवतबाळ-वाशिममधून संजय देशमुख; मावळमधून संजोग वाघेरे-पाटील; सांगलीतून चंद्रहार पाटील; हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर; धाराशीवमधून ओमराजे निंबाळकर; शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे; नाशिकमधून राजाभाऊ वाजे; रायगडमधुन अनंत गिते; सिंधुदुर्ग रत्नागिरीतून विनायक राऊत; ठाण्यातून राजन विचारे, मुंबई-ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षीणमधून अरविंद सावंत, वायव्य मुंबईतून अमोल किर्तीकर; मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई आणि परभणीतून संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.