अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा-एरंडोल तालुक्याचे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या गाडीला त्यांच्याच ताफ्यातील पोलीस वाहनाने मागून धडक दिल्याने किरकोळ अपघात झाल्याची घटना शहरातील सिंधी कॉलनीत घडली आहे. यात कुणालाही इजा झालेली नाही.
आमदार चिमणराव पाटील हे कामाच्या निमित्ताने आपल्या ताफ्यासह अमळनेर येथे पारोळा मार्गे जात असतांना अमळनेर येथे जाण्यासाठी रविवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी निघाले. शहरातील सिंधी कॉलनीकडून जात असतांना त्यांच्याच ताफ्यातील पोलीस वाहन क्रमांक (एमएच १९ ईए ६०१७) ने आमदार पाटील यांचे वाहन क्रमांक (एमएच १९ सीव्ही ५००५) ला मागून धडक दिली. या अपघात कुणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती समोर आले आहे.