पहूर ता. जामनेर प्रतिनिधी l पहूर पेठ येथील केवडेश्वर महादेव मंदिरात सायंकाळी दानपेटी फोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि पहूर पेठ येथील वाघूर नदीच्या तीरावर असलेल्या केवडेश्वर महादेव मंदिरात सायंकाळी ६-३० वाजेच्या दरम्यान केवडेश्वर महादेव मंदिराचे सचिव सुभाष पांडूरंग देशमुख रा.पहूर पेठ यांनी फोन करून सांगितले की, आपले मंदिरावर दानपेटी टोकराने ओढून खाली पाडून त्याचे कुलूप तोडून पैसे चोरी केलेले आहे असे रायदास ओंकार देशमुख यांनी पाहिले आहे. ते रोज दिवाबत्ती करण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी पाहिले असता मंदिराचे गेट कुलूप लावलेले होते. लोखंडी गेटच्या मध्ये टोकर अर्धा बाहेर व अर्धा आतमध्ये अशा स्थितीत पडलेला होता. ठिबकची नळी पायरीवर गेटचे बाहेर पडलेली होती. तसेच दानपेटी खाली पडलेली होती. व कुलूप तोडून खाली पडलेले होते.दानपेटी रिकामी दिसत होती. कोणीतरी अज्ञात चोरट्याने दान पेटीतील ४५०/-रूपयांची चोरी केली असल्याचे दिसून आले. याबाबत समाधान कडूबा पाटील वय ५१ रा.पहूर पेठ यांनी पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.