Home आरोग्य ब्रेकींग न्यूज : राज्यातील कडक निर्बंध १५ दिवसांपर्यंत वाढविले

ब्रेकींग न्यूज : राज्यातील कडक निर्बंध १५ दिवसांपर्यंत वाढविले


मुंबई प्रतिनिधी । ब्रेक द चेनच्या अंतर्गत सध्या सुरू असलेले राज्यातील कडक निर्बंधांना १५ मे पर्यंत वाढविण्यात येत असल्याचा महत्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

कोरोना ची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन राज्यांमध्ये 14 एप्रिल पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते हे निर्बंध एक मे पहाटे सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील असे राज्य सरकारने जाहीर केले होते. दरम्यान कळक निर्बंध लागल्यानंतर राज्यातील रुग्ण संख्या मध्ये लक्षणीयरीत्या घट झाल्याचे दिसून आले आहे. अर्थात या निर्बंधांचा रुग्ण संख्या कमी होण्यासाठी उपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सध्या सुरू असलेले निर्बंध हे वाढवण्यात यावेत अशी अनेक मंत्र्यांनी मागणी केली होती. या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये राज्यातील लोक डाऊन अर्थात कडक निर्बंध हे 15 मे पर्यंत वाढवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Protected Content

Play sound