Home क्राईम Breaking News: मुलीची छेड काढण्याच्या संशयावरून बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

Breaking News: मुलीची छेड काढण्याच्या संशयावरून बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू

0
107


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील आसोदा येथे मुलीची छेड काढण्याच्या संशयावरून एका शेतकऱ्याला केलेल्या मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सुमारास घडली आहे. या घटनेमुळे हा असोदा गावात खळबळ उडाली आहे. जळगाव तालुका पोलीस गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

भास्कर दगडू भंगाळे (वय ४३, रा. असोदा ता. जळगाव) असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव तालुक्यातील आसोदा गावात भास्कर भंगाळे हे पत्नी व मुलासह राहत होते. मजुरी करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान गुरुवारी ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आसोदा गावातील गोकुळ नगर येथे तो गेला होता. त्यावेळेला मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून काही महिला व पुरुषांनी त्याला जाब विचारला. यानंतर काहींनी त्याला थेट मारहाण करायला सुरुवात केली.

या मारहाणीमध्ये भास्कर भंगाळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विन देवचे यांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच शासकीय रुग्णालयात येऊन घटनेची माहिती जाणून घेतली. दरम्यान, या घटनेबाबत आसोदा गावामध्ये खळबळ उडाली असून तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound