मुंबई (प्रतिनिधी) शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भाजप हे पद सोडण्यास तयार नाही. अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. १३व्या विधानसभेचा कार्यकाळ आज (८ नोव्हेंबर) रोजी संपत आहे त्यामुळे तांत्रिकदृष्टया देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गिरीश महाजन, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे हे सुद्धा उपस्थित होते.