Home क्राईम ब्रेकिंग न्युज : सराफा दुकानात दरोडा; ६ जण सीसीटीव्हीत कैद

ब्रेकिंग न्युज : सराफा दुकानात दरोडा; ६ जण सीसीटीव्हीत कैद

0
123


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सराफ बाजार येथील भवानी माता मंदिराजवळील सौरभ ज्वेलर्स दुकानात सोमवार २० मे रोजी पहाटे चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी चाकूचा धाक दाखवत अंदाजे ४० तोडेसोने असा मुद्देमाल जबरी लुटून नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

जळगाव शहरातील सराफ बाजारातील भवानी माता मंदिरा समोरील महेंद्र कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स दुकान आहे. सोमवार २० मे रोजी पहाटे चार ते साडेचार वाजता ३ दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून अज्ञात ६ जण दुकानाच्या मागच्या बाजूने आले. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी मुख्य चॅनेल गेटचे मुख्य दरवाजाचे कुलूप कटरने कापले. त्यानंतर आत प्रवेश केला. त्यानंतर लाकडी दरवाजाचे छोटेसे खिडकीतून आत प्रवेश केला. त्यादुकानात दोन जण झोपलेले होते. या सहा दरोडेखोरांनी चाकूच्या धाक दाखवत शांत राहण्याचे सांगितले. दरडोखोरांनी परत आतील लोखंडी दरवाजाचे कटरने कापले व आत प्रवेश करत जवळपास ४०० ग्रॅम वजनाचे सोने काढून घेतले. दरम्यान पोलिसांचा राऊंडच्या गाडीचा आवाज आला, त्यामुळे त्यांनी घेतलेला जेवढा आहे तेवढा मुद्देमाल घेऊन पसार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर कामगारांनी दुकानाचे मालक कोठारी यांच्याशी संपर्क साधून दरोडा झाल्याची माहिती दिली। महेंद्र कोठारी यांनी तातडीने शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले.

दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. परंतु बाहेरचे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दुचाकीवर आलेले सहा जण सीसीटी कॅमेऱ्यात कैद झाले आहे. जवळपास ४०० ग्रॅम वजनाचे सोने लुटून नेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच सहायक पोलीस निरीक्षक संदीप गावित यांच्यासह पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound