जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातून चारा घेवून येत असतांना शेताच्या बंधाऱ्यावरून बैलगाडी जात असतांना अचानक बैलगाडी उलटी झाल्याने लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा डोक्यात घुसल्याने सातवीत शिकणारा १३ वर्षीय मुलाचा जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना सोमवारी ११ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील वाकडी गावानजीक घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गौरव आंनदा पाटील वय १३ रा. वाकडी ता. जळगाव असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गौरव पाटील हा १३ वर्षीय मुलगा हा आपल्या आईवडी, भाऊ आणि बहिण यांच्यासोबत जळगाव तालुक्यातील वाकडी येथे वास्तव्याला होता. तो म्हसावद गावातील थेपडे गावातील शाळेत सातवीच्या वर्गात शिकत होता. सोमवारी ११ मार्च रोजी दुपारी चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडीने गेला. शेतात चारा घेवून येत असतांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बैलगाडीने शेतातच्या बांधावरून येत होता. त्यावेळी अचानक बैलगाडी उलटी झाला. यात बैलगाडीच्या कठड्याखाली गौरव दाबला गेला. त्यातच बैलांनी झटका दिल्याने लाकडी दुस्सर तुटली. यामुळे लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा गौरवच्या कपाळात घुसला. घटनेत गौरव पाटील हा जागीच ठार झाला. शेतातजवळ असलेल्या काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांची मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. मयत गौरवच्या पश्चात आई ज्योती, वडील आनंदा नामदेव पाटील, बहिण मिनषा आणि भाऊ सौरव असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.