जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातील हायस्कूल जवळ बिबट्याचे दर्शन घडले आहे. गुरूवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने आव्हाणे गावातील नागरीक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणे निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावाजवळील आव्हाणे हायस्कूल समोरून गुरूवार २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास बिबट्या जात असल्याचे दिसून आले. यावेळी रस्त्याने जात असलेल्या नागरीकांनी बिबट्या पाहिल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरीकांनी तात्काळी वनविभागाशी संपर्क साधून माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आव्हाणे गावातील शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी देण्यासाठी न जाण्याचे आवाहन केले आहे. आव्हाणे गावातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.